Rss

  • stumble
  • youtube
  • linkedin

Marathi Poem fighting for #FOE #Censorship – ‘ Gandhi Mala Bhetla’ ( Gandhi met me )

English: Gandhi during the Salt March, March 1...

English: Gandhi during the Salt March, March 1930. Français : Gandhi pendant la Marche du Sel, mars 1930. मराठी: महात्मा गांधी दांडी यात्रेत. (Photo credit: Wikipedia)

गांधी मला

वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० X १२ च्या खोलीत

६ X २ १/२ च्या बाजल्यावर

भारतीयजनतेच्या प्रतीकांत भेटला

तेव्हातो म्हणाला—

सत्यापासूनसौंदर्य वेगळे असूं शकत नाही

सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारां मी सौंदर्य पाहतो

सत्याचाआग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात

असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते

सत्य हे वज्राहूनि कठोर आणि कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या

५३७.६किलोसायकल्सवर

गांधीवंदनाया कार्यक्रमांत भेटला

तेव्हातो बोलला—

महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या

आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा

आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं—

गांधीवंदना हा कार्यक्रम आपण

६ वाजून ५५ मिनिटं ते ६ वाजून २ मिनिटंपर्यंत

तांत्रिक बिघाडामुळे ऐकूं शकला नाहीत

त्याबद्दलआम्ही दिलगीर आहोंत

गांधीमला चार्तुवर्ण्याच्या देवळांत भेटला

तेव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून

पैशाची मोजदाद करत होता

(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं कनवटीला निळी पत्ती लावली)

गांधी मला

बौद्ध मठांत भेटला

तेव्हा तो बीफचिली ओरपत होता

गांधी मला

चर्चमध्ये भेटला

दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे

तो गुडघे टेकून उभा होता

गांधी

चुकला(नंगा) फकीर

मला मशिदींत भेटला

तेव्हातो धर्मांतर करत होता

गांधी मला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारतांत भेटला

तेव्हातो म्हणाला—

हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा प्राणवायू आहे

मला पुनर्जन्म नको आहे

पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा

म्हणजे येणारी दुःखं, यातना, अपमान यांचा मला अनुभव येईल

अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षां

अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म मेलेला मला चालेल

असं बोलून तो तडक भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून

गंगेच्यापात्रात उतरला

गांधी मला

सानेगुरुजींच्या आंतरभारती शाळेंत

आयला झवून बापाला सलाम करणार्‍या

धडपडणार्‍या मुलांना

श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला

तेव्हा श्यामची आई त्याला म्हणाली—

निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला

भर रस्त्यावर हेमामालिनीच्या

नावानं हस्तमैथुन करतांना दिसला

देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले

अहिंसेचा हाहि एक प्रयोग

गांधी मला

टागोरांच्या गीतांजलीत भेटला

तेव्हा तो गोलपिठ्यावर

कविता लिहीत होता

गांधी मला

बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत

अपंगांच्यामहोत्सवात भेटला

तेव्हा तो म्हणाला—

हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे पसरण्यासाठी नसतात

आणि दान हे माणसाला नादान बनवते

असं म्हणून

त्यानं अमेरिकन डॉलरचा चेक अॅक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य भगवान रजनीशांकडे

ध्यानधारणेत

संभोगातूनसमाधीकडे म्हणत

शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला

मार्क्सच्या टोअॅटोमधून ड्रायव्ह इन थिएटरमध्ये

जगातील कामगारांनो एक व्हा

हा पिक्चर पहात टाइम किल करताना भेटला

गांधी मला

माओच्या लाँगमार्चमध्ये भेटला

तेव्हा तो शेतकर्‍याच्या वेषांत

खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला निघाला होता

गांधी मला

डांग्यांच्या गिरणीची भिंत चढून जाताना दिसला

तेव्हा तो ओरडला—

बिर्लाबावटे की जय

गांधी मला

काळागांधीच्या दवाखान्यांत

सावरकरांना सँपलची बाटली विकताना भेटला

गांधी मला

अटलबिहारीवाजपेयींच्या पेशवाईंत भेटला

तेव्हा तो गांधीवादी समाजवादाची जपमाळ ओढत होता

गांधी मला

चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला

तेव्हा तो घोषणा देत होता—

आमरबाडी तोमार बाडी

सकलबाडी नक्षलबाडी

लालकिलेपे लाल निशान

माँगरहा हैं हिंदुस्तान

गांधी मला

क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते

शांततेचं नोबेल पारितोषिक घेतांना भेटला

गांधी मला

व्हाइटहाऊसमध्ये

रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला

माणसं मेलेल्या जगांतली

स्थावरजंगम मालमत्ता दाखवून

गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला

छत्रपतीशिवाजी विडीचे झुरके घेत

फोरासरोडला ५८० नंबरच्या कमर्‍यांत

रंगरंगोटीकेलेल्या लोकशाही नांवाच्या रांडेकडे भेटला

तेव्हांती म्हणाली—

तूं कुठली चिकित्सा करणार आहेस?

तूं कुठला प्रयोग करणार आहेस?

तूं कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला

परमपूजनीयसरसंघचालक

बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर

अखंड हिंदुस्थानाच्या जयघोषांत

अर्धीचड्डी सांवरत़ ६१-६२ उठाबशा काढत घोषणा देताना दिसला

मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे

वंदेमातरम्

कॉन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून इंग्लड-अमेरिकेंत स्थायिक करीन

गांधी मला

जमाते इस्लामच्या घोगारी मोहोल्ल्यांत

पेट्रोडॉलरच्या थ्री-इ-वनमध्ये

पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थान क्रिकेट कॉमेंट्री ऐकताना दिसला

पाकिस्तानचा हिंदुस्थानवर २ गडी राखून विजय

हे ऐकतांच तो नमाज पढला

मोहोल्ला-मोहोल्ल्यातजाऊन त्यानं ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला

सदाशिवपेठेतल्या ना.ग. गोर्‍यांच्या वाड्यांत भेटला

तेव्हा तो म्हणाला

स्वातंत्र्याला इतकीं वर्षं झाली तरी आम्हाला

भारत माझा देश आहे

या देशावर माझे प्रेम आहे

इथल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान आहे

मी माणसांचा मान ठेवीन

मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन

असं म्हणावं लागत याची मला खंत वाटते

असं मला लंडनच्या टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला

आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्यें भेटला

तेव्हा तो स्वातंत्र्यसैनिकांच्या

पेन्शनीचा हिशेब करत होता

गांधी मला

स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या

कुटुंबकल्याणकेंद्रात भेटला

तेव्हां उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत

मालिश करून घेत

बदामपिस्ते मिठाई खात

भारत मे समाजवाद क्यों नही आता

ह्यावरतो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला

अखिल भारतीय हिजड्यांच्या संमेलनात

कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला

तेव्हा आशाळभूत चव्हाण

रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून

संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला

आम जनताकी संपत्ति असलेल्या पृथ्वीवर

बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करतांना भेटला

तेव्हा तो म्हणाला

निधर्मी देश क्या पहचान

छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला

हाजीमस्तानच्या साम्राज्यांत दिसला

तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला

त्याच्या पंच्यावर मी कधींच गेलो नाही

पंचा काय धोतर काय नि पटलून काय

सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात

हो

अगदीकवितेंतूनसुद्धा

गांधी मला

बाटाच्या कारखान्यांत

बुटाला शिलाई मारतांना दिसला

तेव्हा बाबूजी गांधीना म्हणला

इस देश में चमार कभी प्राइम मिनिस्टर नही हो सकता

गांधी मला

मोरारजीच्या ओशियानात भेटला

शिवाम्बूच्या तारेंत तो म्हणाला

स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशून्य असतात

मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं—

हे आपल्या लक्षांत आलं असेलच

गांधी मला

नियतीशीसंकेत करतांना

नेहरूंच्या तीन मूर्तीत भेटला

तुम्ही आमच्या विश्वासातले

गादीनंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला

चरणसिंगांच्या सूरजकुंडात भेटला

तेव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला—

मेरे जिंदगीकी तमन्ना पुरू हो गयी

गांधी मला

कमलेश्वरच्यापरिक्रमांत दिसला

तेव्हातो म्हणाला—

मनोरंजनाचीए यू साधन

तळागाळातल्याजनतेपर्यंत पोंचवायचं माझं स्वप्न साकार झालं

(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आंडपंचा आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला

तेव्हा तो मटक्यांतून

राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला

सर्वभूमि गोपलकी म्हणणार्‍या

विनोबांच्या धारावीत

टिनपाट घेऊन हायवेच्या रांगेत

क्रुश्चेव्हला गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला

इंदिरा गांधींच्या १ सफदरजंग कारस्थानात भेटला

धटिंगण आय-माय कार्यकर्त्यानं

त्याच्या गांडीवर लाथ मारली

तेव्हातो ओरडला—

देश कीनेता इंदिरा गांधी

युवकोंकानेता संजय गांधी

बच्चोंकानेता वरुण गांधी

भाड में गया महात्मा गांधी

गांधी मला

अजितनाथ रेच्या न्यायालयात

आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला

सत्याचे प्रयोग करून

देश धोक्यात आणल्याबद्दल

राष्ट्रद्रोहाच्याआरोपाखाली

त्याला फांशी दिला

गांधी मला

अत्र्यांच्या शिवशक्तीत

गांधींवर अग्रलेख लिहितांना दिसला

गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले

धन्य झालो

अब्जावधी वर्षांत आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही

स्वदेशीरहा-स्वदेशी बना

असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर

वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या

खांद्यावर हात ठेवून म्हणाला—

देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे

आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही

आणिदेवमाणसाला तर नाहींच नाही

–आणि क्षणार्धात तो समाधीत गेला….

–वसंतदत्तात्रेय गुर्जर, प्रास प्रकाशन

Related posts

Comments (4)

  1. […] Read Marathi Poem https://kractivist.org/marathi-poem-fighting-for-foe-censorship-gandhi-mala-bhetla-gandhi-met-me/ […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: